जळगाव शहरात मोफत नेत्र तपासणी शिबिर


जळगाव : जनमत प्रतिष्ठान, सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था, भुसावळ व मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर नुकतेच शहरात झाले. जनमत प्रतिष्ठान मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था जळगाव शहरांमध्ये बर्‍याच वर्षापासून कार्यरत असून संस्थेतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. विवेक मंगलसिंग सोनवणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी डॉ.राहूल महाजन यांच्या माँ साहेब केअर सेंटर व स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. 155 रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. डॉ.राहुल महाजन यांनी नेत्ररोग तपासणी केली.

यांची शिबिराला प्रमुख उपस्थिती
नीता सोनवणे, पंकज नाले, विवेक सोनवणे, राजश्री नेवे यांची प्रमुख उपस्थिती. अ‍ॅडव्हान्स आय केअर सेंटर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे राहुल पवार तसेच डॉ.रोशन देशमुख यांचे सहकार्य लाभले. यावेळी जनमत प्रतिष्ठान, सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था, भुसावळ व मुक्ताई फाउंडेशनच्या नीता सोनवणे, पंकज सोनवणे यांची उपस्थिती होती. या शिबिरासाठी राजश्री नेवे, हर्षाली पाटील, माया चौधरी, निता गाजरे, प्रियंका नेवे यांनी परीश्रम घेतले.


कॉपी करू नका.