जळगावात चोरट्यांनी शाळेतून चक्क तिजोरीच लांबवली


जळगाव : विविध क्लृप्त्यांमुळे अनेकदा चोरटे नागरीकांच्या लक्षात राहतात.असाच काहीसा प्रकार शहरातील शिरसोली रोडवरील एल. एच. पाटील इंग्लिश मेडीयम स्कूलमध्ये शुक्रवारी पहाटे उघडकीस आला. चोरट्यांनी चेअरमन साहेबांच्या दालनातून चक्क तिजोरीच लांबवली असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या तिजोरीमध्ये सुमारे 30 हजार रुपयाची रक्कम असल्याचे समजेते. शुक्रवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास चोरट्यांनी शाळेच्या मागील गेटचे काच फोडून प्रवेश करीत प्राचार्य, चेअरमन व शेजारील दोन कॅबीनचे लॉक तोडले मात्र काहीच हाती न लागल्याने चोरट्यांनी चक्क चेअरमन यांच्या दालनातील तिजोरीच लांबवली. याबाबत स्कूल प्रशासनाने एम.आय.डी.सी पोलीस स्टेशनला तक्रार दिली.


कॉपी करू नका.