धुळ्यात इंडस्ट्रीयल कॉरीडॉरसाठी अनोखे आंदोलन ः सर्जा-राजाची पूजा करून सरकारचा निषेध
![](https://breakingmaharashtra.com/wp-content/uploads/2019/08/Dhule-andolan.jpg)
धुळे : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडॉर प्रकल्पाचे कामकाज धुळे जिल्ह्यामध्ये लवकर सुरू व्हावे या संदर्भामध्ये गेल्या तीन दिवसांपासून रणजीतराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील कोअर कमिटी सदस्य, ज्येष्ठ नागरिक, तरुण गेल्या तीन दिवसांपासून जेल रोडवर धरणे आंदोलनाला बसले आहेत. शुक्रवारी आंदोलनाच्या तिसर्या दिवशी पोळा सणाचे औचित्य साधून सर्जा-राजाचे पूजन करण्यात आले. बैल जोडीवर अतिशय चांगल्या पध्दतीने कॉरीडॉर प्रकल्प झालाच पाहिजे अशा पध्दतीच्या घोषणा लिहिण्यात आल्या तसेच दुसर्या बाजूला दिरंगाईमुळे सरकारचा निषेध दर्शवण्यात आला.
विविध संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा
या धरणे आंदोलनात विविध पक्ष, संघटना, तरुण, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत असून धुळ्यातील जनतेचा प्रतिसाद चांगल्यारीतीने दिसून येत आहे. विविध पक्षाचे व संघटनाच्या पदाधिकार्यांनी आंदोलन ठिकाणी भेट देवून आपला पाठिंबा दर्शवला आहे.
![](https://breakingmaharashtra.com/wp-content/uploads/2025/02/mantri-niwad.jpg)