भुसावळात खराब रस्त्यांमुळे आयशर उलटला


भुसावळ : सावद्याकडून जळगावकडे जाणारा आयशर ट्रक शहरातील सरदार वल्लभाई पटेल पुतळ्याजवळ रस्त्यावरील खड्डे चुकवताना उलटला. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत एका फळ विके्रत्याच्या लोटगाडीचे सुमारे 10 ते 12 हजारांचे नुकसान झाले तर सुदैवाने नागरीक बचावले. शहरातील खराब रस्त्यांमुळे अपघात नित्यांचे झाले असून साधी डागडूजीदेखील नसल्याने वाहनधारकांमध्ये सत्ताधार्‍यांमध्ये प्रचंड रोष आहे. सावद्याकडे जळगावकडे जाणारा आयशर ट्रक (एम.एच.19 झेड.5576) हा खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात उलटला. अपघातानंतर शहर पोलिसांनी धाव घेत गर्दी हटवली.


कॉपी करू नका.