खिरवडच्या युवकाची आत्महत्या
रावेर : तालुक्यातील खिरवड येथील 34 वर्षीय युवकाने पोळा सणाच्या दिवशीच शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास साडीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने गावावर शोककळा पसरली. जितेंद्र ज्ञानेश्वर गाढे असे मृत युवकाचे नाव आहे. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घरातील पत्र्याच्या अँगलला साडी अडकवत या युवकाने आत्महत्या केली. या संदर्भात शांताराम रामु गाढे यांच्या खबरीनुसार रावेर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार जितेंद्र नारेकर करीत आहेत.