रेल्वे खाली आल्याने महिलेचा दुसखेडा रेल्वे स्थानकाजवळ मृत्यू
भुसावळ : रावेर तालुक्यातील दुसखेडा रेल्वे स्थानकाजवळ अप सुरत-भागलपूर एक्सप्रेसखाली आल्याने 50 वर्षीय अनोळखी महिलेचा मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी 12.45 वाजेपूर्वी ही घटना घडली. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दुसखेडा रेल्वे स्थानकाजवळील किलोमीटर क्रमांक 451/1214 जवळ 50 वर्षीय अनोळखी महिलेचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला. उंची 5.2, रंग गौरवर्ण, शरीर बांधा सडपातळ, डोक्याचे केस काळे-पांढरे, चेहरा गोल, अंगात लाल-पिवळ्या रंगाची साडी, लाल रंगाचे ब्लाऊज असे अनोळखी मयत महिलेचे वर्णन असून ओळख पटत असल्यास भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याचे एएसआय बाबूलाल खरात यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.