फैजपूर व वाडगाव पालिकेची सर्वेक्षणासाठी निवड


मुंबई आयटीच्या विद्यार्थ्यांकडून सर्वेक्षणाला सुरुवत

फैजपूर- फैजपूर व वाडगाव पालिकेची सर्वेक्षणासाठी निवड निवड झाली असून मुंबईतील आयटीच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्षात शनिवारपासून सर्वेक्षणाला सुरुवत झाली. आय.आय.टी.मुंबई यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या ग्रामीण भाग व लहान शहरे यांच्यासाठी पावसाच्या पाण्याचे निसा:रण, सांडपाणी व्यवस्थापन, पाणीपुरवठा व्यवस्था, व घनकचरा व्यवस्थापन या चार मुद्यांच्या आधारे शहराचे सर्वेक्षण मुंबई येथील आलेले आयआयटीचे विद्यार्थी करणार आहेत. फैजपूर शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते त्यातच महाराष्ट्रातून दोनच पालिकांची निवड या सर्वेक्षणात करण्यात आली आहे. यात शहरातील पाण्यासंदर्भात घनकचरा संदर्भात व सांडपाणी संदर्भात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या चारही प्रकल्पांसाठी एकत्रीत येणारा खर्च नेहमीच्या खर्चापेक्षा खूपच कमी होणार आहे. फैजपूर नगरपरीषदसारख्या ‘क’ वर्ग नगरपरीषदेला स्वतचा विकास करून घेण्यासाठी हे फायदेशीर ठरणार आहे. त्या दृष्टीने सदर संस्थेमार्फत सामाजिक सर्वेक्षणासाठी 30 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

सर्वेक्षणाला विद्यार्थ्यांकडून सर्वेक्षण
सर्वेक्षणाला 31 ऑगस्टपासून सुरूवात करण्यात आली. आयआयटी मुंबई व पालिकेमार्फत हे सर्वेक्षण परीसरात करण्यात येणार आहे. यात फैजपूर पालिका व वाडगांव, जिल्हा पुणे येथिल दोनच पालिकांची निवड या सर्वेक्षणात करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच हे सर्वेक्षण होत असून प्रथम दोन पालिकांसाठी हा प्रयोग करण्यात येत आहे. हा प्रयोग फायदेशीर ठरल्यास महाराष्ट्रातील प्रत्येक पालिकेवर असेच सर्वेक्षण करण्यात येणार आहे आणि या सर्वेक्षणाचा आयआयटी अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार आहे.

प्रत्येक दिवशी दोन प्रभागात सर्वेक्षण होणार
आयआयटी मुंबई व पालिकेच्या संयुक्त विद्यमानाने शहरात आठ दिवस सर्वेक्षण आयआयटी मुंबई येथील विद्यार्थी करणार आहे. प्रत्येक दिवशी दोन वॉर्डात प्रत्येक घरोघरी जाऊन चार मुद्यांच्या आधारे सर्वेक्षण केले जाणार आहे. फैजपूर शहरात आयआयटीचे 30 विद्यार्थ्यांची टीम दाखल झालेली आहे हे विद्यार्थी प्रत्येक घराघरात जाऊन समस्या जाणून घेणार आहे त्यामुळे नागरीकांनी सदर सर्वेक्षणाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा व विचारलेल्या योग्य प्रश्नांची उत्तरे द्यावी, असे आवाहन नागरीकांना करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले आहे.


कॉपी करू नका.