खान्देशातील 12 सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या
10 अधिकार्यांचा जिल्ह्यातील कालावधी पूर्ण तर दोन विनंती बदल्या मान्य
जळगाव : जिल्ह्यात कालावधी पूर्ण केलेल्या खान्देशातील एकूण 12 सहा.निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात दहा बदल्या जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण झालेल्यांच्या तर दोन बदल्या या विनंती मान्य करून करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे आदेश शुक्रवारी सायंकाळी नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.प्रताप आर.दीघावकर यांनी काढले आहेत. बदल्यांमध्ये जळगाव जिल्ह्यात कालावधी पूर्ण झालेल्या सात अधिकार्यांसह नंदुरबार जिल्ह्यातील दोन तर धुळ्यातील एका अधिकार्याचा समावेश आहे तर विनंती बदल्यांमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.
या सहा.निरीक्षकांच्या बदल्या
धुळ्याचे अरविंद कोट्या वळवी यांची नंदुरबारला (स्वग्राम तालुका वगळून), जळगावचे राहुल तुकाराम वाघ यांची नाशिक ग्रामीण, जळगावचे सुरेश भिकाभाऊ शिरसाठ यांची धुळे, जळगावचे मनोज गणपतराव पवार यांची नाशिक ग्रामीण, जळगावचे महेश ईश्वर जानकर यांची अहमदनगर, जळगावचे आशिष साहेबराव रोही यांची नाशिक ग्रामीण, जळगावचे दिलीप कचरू शिरसाठ यांची अहमदनगर, नंदुरबारचे सुनील तानाजी बच्छाव यांची जळगाव, नंदुरबारचे मनोहर दौलतराव पवार यांची नाशिक ग्रामीणला बदली करण्यात आली आहे. सचिन बेंद्रे यांना निलंबीत करण्यात आल्याने त्यांना सध्याच्या घटकात ठेवण्यात आले आहे.





सात सहा.निरीक्षकांच्या विनंती बदल्या ः नंदुरबारच्या दोघांचा समावेश
अहमदनगर येथील चार अधिकार्यांची विनंती बदली मान्य करण्यात आली आहे. त्यात नितीन जगन्नाथ शिंदे यांची नाशिक ग्रामीण, नितीन सुदाम पाटील यांची नंदुरबार, वसंत उत्तम पवार यांची नाशिक ग्रामीण, पप्पू यासीन कादरी यांची नाशिक ग्रामीणला बदली झाली आहे. नंदुरबारचे दीपक दगडू पाटील यांची नाशिक ग्रामीणला तसेच नंदुरबारचेच सोमनाथ रंभाजी दिवटे यांची अहमदनगर तर नाशिक ग्रामीणचे युवराज अरविंद आठरे यांची नगरला बदली करण्यात आली आहे.
