भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी ‘लाच देऊ नका, लाच घेऊ नका’
नंदुरबार एसीबी कार्यालयात कर्मचार्यांनी घेतली शपथ
नंदुरबार : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंती तथा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून नंदुरबार एसीबी कार्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी पोलिस उपअधीक्षक शिरीष जाधव यांनी लोहपुरूष सरदार पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी कार्यालयातील सहकार्यांनी भ्रष्टाचारमुक्तीसाठी शपथ घेतली.
लाच मागणार्यांविरुद्ध करा तक्रार
कोणत्याही लोकसेवकाने किंवा त्याच्यावतीने खाजगी इसमाने शासकीय काम करण्यासाठी वा करण्यासाठी तसेच लवकर करून देण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी लाचेची मागणी केल्यास टोल फ्री क्रमांक 1064 किंवा 02564-230009 तसेच मोबाइल 9594401777 या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच आपल्या नावाची गुप्तता ठेवून त्वरीत कारवाई करण्यात येईल असे आवाहन पोलिस उपअधीक्षक शिरीष जाधव यांनी नंदुरबार जिल्हावासीयांना केले आहे.





