पुनखेड्यात एकाची रेल्वेखाली आत्महत्या
रावेर- तालुक्यातील पुनखेडे येथील एका इसमाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याबाबत रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुनखेडे येथील कृष्णा अंबादास भारती (गोसावी, 45) यांनी बुधवारी 1.35 पूर्वी रावेर ते वाघोडा रेल्वे स्टेशनदरम्यान पुनखेडे शिवारात खांबा क्रमांक 480/ 08 जवळ धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. याबाबत रावेर स्टेशन रेल्वे मास्टर डी.पी.सिंग यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितेंद्र नारेकर पुढील तपास करीत आहेत.