जळगावातील हद्दपार आरोपी जाळ्यात


जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव : गुन्हेगारी पार्श्‍वभूमीवर  जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला पवन संजय कुमावत (22, हरीविठ्ठल नगर, कोठारी नगर, जळगाव)  हा शहरातील गेंदालाल मिल परीसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक करीत त्याच्याविरुद्ध जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपी हा त्याच्या घरात असताना त्याच्या मुसक्या आवळताना घरातून लोखंडी कोयताही मिळाल्याने आर्म अ‍ॅक्टचा अतिरीक्त गुन्हाही दाखल करण्यात आला.

यांच्या पथकाने आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांच्या नेतृत्वात एसएसआय अशोक महाजन, हवालदार सुनील दामोदरे, विजय शामराव पाटील, सचिन महाजन, भगवान पाटील, नंदलाल पाटील, अशोक पाटील आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.