कॉ.गोविंद पानसरे हत्या प्रकरण : तीन संशयीतांना अटक
कोल्हापूर : ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी मुंबईसह पुण्यातून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सचिन अंदुरे, अमित बद्दी, गणेश मिश्किन अशी एसआयटीने ताब्यात घेतलेल्या संशयीतांची नावे आहेत. संशयीतांना कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. अंदुरे, बद्दी आणि मिस्कीन यांना ताब्यात घेतल्यामुळे आत्तापर्यंत अटक झालेल्या संशयीत आरोपींची संख्या 12 झाली आहे.
दोघांना आर्थर जेलमधून घेतले ताब्यात
डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सचिन अंदुरे याला पुण्यातील तुरूंगातून ताब्यात घेण्यात आले आहे. अमित बद्दी आणि गणेश मिस्किन यांना मुंबई येथील आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, 16 फेब्रुवारी 2015 रोजी विचारवंत पानसरे आणि त्यांची पत्नी उमा पानसरे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोनांनी गोळ्या झाडल्या होत्या तर गोविंद पानसरे यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला होता.