जळगावात 285 ऑटो रीक्षांसह 96 टाटा मॅजिक जप्त
जळगाव- विद्यार्थी वाहतूक करणार्या संघटनांसह वाहनधारकांच्या बैठकीत नियंमाचे पालन करावे, विना परवाना वाहनांमधुन विद्यार्थी वाहतूक थांबावी याबाबत चालकांना सुचना करण्यात आल्या होत्या. 31 जुलैपर्यंत मुदत देवूनही चालक व मालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे 285 ऑटोरिक्षांसह 96 टाटा मॅजिक वाहने ताब्यात घेयात आल्याने वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली.
वाहने जप्त झाल्याने वाहनधारकांमध्ये खळबळ
शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास खाजगी वाहनांना कायदेशीर परवानगी नसतांना मारुती ओम्नी आणि टाटा मॅजिक या छोट्या व्हॅनद्वारे शाळकरी विद्यार्थी वाहतूक सुरू होती. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जुन महिन्यात विद्यार्थी वाहतूक करणार्या वाहनधारकांची बैठक घेतली होती. 31 जुलैअखेर सुधारणा करण्याची संधी दिल्यानंतर वाहनधारकांनी दखल न घेतल्याने सप्टेंबर महिना सुरू होताच उपप्रादेशिक परीवहन विभागाने मोहिम हाती घेवून 285 ऑटो रीक्षा 96 टाटा मॅजिक वाहने जमा केल्याने वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली.