शहाण्यात स्पिरीट जप्त : एकाविरुद्ध गुन्हा
शहादा : तालुक्यातील शहाणा येथे पोलिसांनी छापा टाकत स्पिरिटसह एकूण 57 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणी एका विरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. टेनसिंग उर्फ तेरसिंग शंकर पावरा असे संशयिताचे नाव आहे. 26 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास शहादा तालुक्यातील शहाणा गावातील जंगलात गोपाल बिरबल पावरा यांच्या शेताच्या बाजूला लिंबाच्या झाडाखाली बेकायदेशीररीत्या साठवलेले स्पिरीट जप्त करण्यात आले.
स्पिरीटासह अन्य साहित्य जप्त
त्यात 25 हजार रुपये किंमतीचा एक निळ्या रंगाचा ड्रम त्यात 100 लिटर स्पिरिट, दहा हजार रुपये किमतीचा 1 सफेद साचा, प्लास्टिकची कॅन त्यात 40 लिटर स्पिरिट, 22 हजार रुपये किंमतीच्या तीन प्लास्टिकच्या गोण्या त्यात एक-एक लिटरच्या स्पिरीटने भरलेल्या अशा एकूण 90 पिशव्या असा एकूण 57 हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अमृत विनायक पाटील यांच्या फिर्यादीवरून तेनसिंग उर्फ तेरसिंग शंकर पावरा (रा.बोरपाणी, ता.शिरपूर जि. धुळे) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक परदेशी करीत आहेत.





