वैशाली चव्हाण राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारीरत्न पुरस्काराने सन्मानीत


मनवेल, ता.यावल (गोकुळ कोळी) : आस्था अनघादी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या संस्थापिका अध्यक्षा वैशाली चव्हाण यांचा ,ज्ञान संकल्प सामाजिक संस्था दौंड, महाराष्ट्र संस्थेतर्फे राज्यस्तरीय कर्तृत्ववान नारीरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश आप्पा थोरात, पुणे जिल्हा म.स.बँकेचे आप्पासाहेब पवार सोहेल खान, सचिन कुलथे, उपनिरीक्षक् सचिन पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.

नाविण्यपूर्ण उपक्रमांची दखल
वैशाली चव्हाण या शिंदखेडा तहसीलदार सुनील सौंदाणे यांच्या सौभाग्यवती असून गेल्या अनेक वर्षांपासून या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. संस्थेमार्फत विविध समाजोपयोगी उपक्रम त्या राबवतात. पुढील आठवड्यात ‘एक स्वेटर उबदार’ हा उपक्रम घेऊन गरजु लोकांना स्वेटर, ब्लँकेट, चादरी त्या वाटप करणार आहे. नवनवीन उपक्रमांची दखल घेत त्यांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. गत महिन्यात फिल्म सोसायटीतील प्रतिष्ठित मानला जाणारा दादासाहेब फाळके कोरोना योध्दा पुरस्कार 2020 देऊन त्यांना सन्मानीत करण्यात होते. याचे श्रेय त्यांनी संस्थेचे पदाधिकारी, तसेच आई-वडील, बंधू यांचे आशीर्वाद व पती सुनील सौंदाणे यांना दिले आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ज्ञान संकल्प संस्थेचे अध्यक्ष सदाशीव रणदिवे, सुभाष भोसले, वैशाली रणदिवे, प्रा.दिनेश पवार आदी पदाधिकार्‍यांचे त्यांनी आभार मानले आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !