‘दैनिक जनशक्ती’चे मालक कुंदनदादा ढाके यांचे हृदयविकाराने निधन


आज अंत्ययात्रा : आधारस्तंभ निखळला : सर्व स्तरावरून शोककळा

भुसावळ : ‘दैनिक जनशक्ती’चे संपादक, मालक तथा सिद्धीविनायक ग्रुपचे चेअरमन कुंदनदादा दत्तात्रय ढाके (48) यांचे सोमवारी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुणे येथे निधन झाले. पहाटे ते मॉर्निंग वॉकसाठी मित्रांसोबत निघाल्यानंतर काही अंतरावरच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ते वेडिमाता ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय ढाके यांचे धाकटे चिरंजीव तर सिद्धीविनायक ग्रुपचे संचालक यतीन ढाके यांचे लहान बंधू होत. त्यांच्या पश्‍चात पत्नी कांचन, मुलगा क्रीश, मुलगी महिमा, भाऊ यतीन ढाके असा परीवार आहे.

आज सायंकाळी सात वाजता अंत्ययात्रा
कुंदनदादा ढाके यांच्या मृतदेहावर भुसावळ येथे सोमवारी सायंकाळी सात वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जुना सातारा भागातील वेडिमाता मंदिरापासून सायंकाळी सात वाजता अंत्ययात्रा निघणार आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !