नवापुरात दोन धाडसी घरफोड्या : लाखोंच्या ऐवजावर चोरट्यांनी मारला डल्ला


नवापूर : नवापूर शहरातील मंगलदास पार्क येथे दोन घरफोडीत चोरट्यांनी लाखोंचा ऐवस लंपास केला असुन गुलाबी थंडीत बंद घरे हेरुन गाढ झोपेचा फायदा घेत चोरटे सक्रीय झाले आहेत. नवापूर शहरातील उचभ्रू वस्ती असलेल्या मंगलदास पार्क परीसरात रात्री 3 ते 4 सुमारास दोन घरफोड्या झाल्याने नागरिकां मध्ये भीती चे वातावरण निर्माण झाले आहे. मंगलदास पार्क परीसरात डॉ.कटारिया यांच्या मागील बाजूस असलेल्या रोड वरील सेवा निवृत्त प्राध्यापक जी.एस पाटील व सेवानिवृत्त शिक्षिका विजयाताई जडे यांचा घरात चोरी झाली आहे. दोघ समोरासमोर राहतात. विजयाताई जडे या मागील एक वर्षापासून परराज्यात हैदराबाद येथे वास्तव्यास असल्याने बंद घरात चोरट्यांना कोणतीही किमती वस्तू मिळालेले नाही.घरातील सामान अस्ताव्यस्त पडुन आहे. प्रा.जी एस पाटील यांच्या बाहेरील घरातील खिडकी ची लोखंडी ग्रील तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. घरातील खालच्या मजल्या वर वयोवृद्ध जोडपे झोपलेले होते बेडरूम मध्ये प्रवेश करून 85 वर्षीय वृद्धाचा हातातील सोन्याची अंगठी व कपाटातील मंगळसूत्र असे अंदाजित लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले आहे. चोरट्यांनी घरात प्रवेश करताना झाडे कापण्यासाठी घराच्या पुढच्या बाजूस ठेवलेला कोयता उचलून घरात खालच्या रूम मध्ये असलेल्या वृद्ध दाम्पत्यांना धमकावत दागिने घेऊन गेल्याचे सांगण्यात आले असून चोरट्यांनी कोणासही इजा पोहचवली नसल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे प्राध्यापक जी. एस.पाटील यांनी सांगितले. वेळीच गस्त करत असलेल्या पोलीस वाहनाचा सायरन ऐकल्याने चोरट्याने पळ काढला होता. त्या परिसरात पोलीस गस्त घालत असतांना ही चोरट्यांनी केलेली घरफोडी नवापूर पोलिसांना जणू काही आव्हान दिले असल्याचे बोलले जात आहे. घटनेदरम्यान मराठी बोली भाषा बोलणाऱ्या चोरट्यांचा हातात असलेल्या कोयता बघून वृद्ध दांम्पत्यांनी चोरट्यांना प्रतिकार न केल्याने जीवित हानी टळली आहे. प्रत्यक्ष दर्शीने वर्णन केल्यानुसार चोरटे धड धाकड होते .तीन चोरट्या पैकी दोन रुमाल बांधून होते तर एक मराठी भाषा बोलत असल्याचे समजते. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून परिसरातील घरा बाहेर लावलेल्या सीसीटिव्ही फुटेज तपासले जात असून लवकरच चोरट्यांना जेरबंद करू असा विश्वास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी असलेले सहायक पोलिस निरीक्षक धीरज महाजन यांनी व्यक्त केला आहे.

काही मिनिटांचे अंतर कमी पडले..!
मंगलदास पार्कमध्ये दोन सेवानिवृत्त शिक्षकांच्या घर चोरट्यांनी फोडले त्या रात्री दोन ते तीन वाजेचा सुमारास चोरट्यांनी चोरी करून पलायन केले तोच काही मिनिटात सहायक पोलीस निरीक्षक धिरज महाजन पेट्रोलिंग करत असताना तेथे आले. त्यांनी परिसरात चोरट्यांच्या तपास केला मात्र ते मिळू शकले नाही. चोट्यांच्या कसून तपास करण्यात येत आहे. बंद घरे हेरून तेथे चोरी करण्याचे सत्र चोरट्यांनी सुरू केले आहे. रात्री थंडीचा जोर वाढल्याने कॉलनी व उच्चभ्रू परिसरात लवकर घरे बंद होतात याचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी सुरू केले आहे.






जान है तो जहान है..!
नवापूर शहरातील सेवानिवृत्त प्राध्यापक जी एस पाटील यांचे मंगलदास पार्क येथे घर आहे त्यांच्या पत्नी प्रा.पी.जी पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. दोघा वरच्या खोलीत झोपले होते त्यांचे सासरे व सासु वयोवृध्द पती-पत्नी खालच्या रूममध्ये झोपले होते. त्यांना धमकावत त्यांचाकडुन सोन्याचा अंगुठी काढुन नेले.मराठीत संभाषण करत होते.

पती-पत्नीना बाहेरुन कडी लावुन कोंडले.
सेवानिवृत्त प्राध्यापक जी एस पाटील व प्राध्यापिका पी जी पाटील हे वरच्या खोलीत झोपले असताना त्यांना खालून आवाज आल्याने त्यांनी आरडा ओरड सुरू केली.चोर आल्याचे कळले वयोवृध्द दांपत्य ही ओरडत होते हे पाहून चोरट्यांनी त्यांना धमकावत वरच्या रूमकडे धाव घेऊन बाहेर दरवाजाची कडी लावुन पसार झाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !