जळगावात रीक्षा चालकाच्या घरातून मोबाईल लांबवला
जळगाव : शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील रीक्षा चालकाच्या घरातून ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांनी ५ हजार रूपये किंमतीचा लांबविला असून रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जयभीम दयाराम सोनवणे (४२, रा. पिंप्राळा हुडको) हे रीक्षा चालक असून रीक्षा चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घरी असतांना त्यांनी त्यांचा ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चार्जींगला टेबलावर लावला होता. त्यानंतर घरातील कामात व्यस्त होते. अज्ञात चोरट्यांनी संधाचा फायदा घेवून टेबलावरील मोबाईल चोरून नेल्याचे उघडकीला आहे. जयभीम सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
