भुसावळात दमदार पावसाची हजेरी ; खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनधारकांना अधिक मनस्ताप


भुसावळ- शहरात सोमवारी सायंकाळपासून दमदार पावसाने हजेरी लावली. तालुक्यात गेल्या 24 तासांमध्ये 46 मिलीमिटर पावसाची नोंद करण्यात आली. सोमवारी सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत पाऊस कायम होता. शहरातील रस्त्यांची आधीच दुरवस्था झाली असताना पावसामुळे खड्ड्यात पाणी जमल्याने वाहनधारकांची आणखीन गैरसोय झाली. पावसामुळे गणेश दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या आशेवर काहीसे पाणी फिरले तर रात्री उशिरा मात्र भाविक पुन्हा श्रींच्या दर्शनासाठी रवाना झाल्याचे चित्र दिसून आले. रविवारी सकाळी आठ ते सोमवारी सकाळी आठपर्यंतच्या 24 तासांमध्ये भुसावळ मंडळात 12.2, वरणगावात 18, कुर्‍हे पानाचे 6 तर पिंपळगाव मंडळात 10 मिली पावसाची नोंद करण्यात आली. भुसावळ तालुक्यात 46.2 मिली तर सरासरी 11.55 मिली पाऊस झाला. सोमवारी सायंकाळीदेखील पावसाने हजेरी लावली.


कॉपी करू नका.