जळगावात महिलेचे मंगळसूत्र लांबवले


बसमध्ये चढताना घडली घटना : सातोदच्या महिलेवर कोसळले संकट

जळगाव : बसमध्ये चढत असताना महिला प्रवाशीची सोनसाखळी चोरट्यांनी लांबवल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 वाजता जळगाव बसस्थानकात घडली.
रत्ना हेमराज तळेले (52, रा.सातोद, ता.यावल) या महिलेवर संकट ओढवले. धार्मिक कार्यक्रमासाठी जळगावात आलेल्या तळेले या कार्यक्रम आटोपुन मंगळवारी पुन्हा घरी जण्यासाठी त्या बसस्थानकात आल्या असता बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील चार ग्रॅम वजनाची सोनसाखळी लांबवली. बसमध्ये बसल्यानंतर सोनसाखळीमधील काही मणी खाली पडलेले दिसून आल्यानंतर त्यांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी आरडा-ओरड करुन सह प्रवाशांना सांगीतल्यानंतर बस थांबवण्यात आली परंतु तो पर्यंत चोरटे पसार झाले. बसमध्ये चढत असताना दोन महिलांनी धक्का दिला होता. याच महिलांनी सोनसाखळी लांबवल्याचा संशय तळेले यांनी वर्तवला आहे.

सकाळीही सोनसाखळी लांबवण्याचा प्रयत्न
मंगळवारी सकाळी बसस्थानकात आणखी एका घटनेत महिलेची सोनसाखळी दोन लहान मुलींनी लांबवली तर ही घटना वेळीच लक्षात आल्यानंतर त्या मुलींनी सोनसाखळी फेकुन देत पळ काढला होता. यावेळी बसस्थानकात ड्युटीवर असलेल्या पोलिस कर्मचार्‍याने मुलींचा शोध घेतला परंतू, त्या मिळून आल्या नाहीत.


कॉपी करू नका.