जीप दरीत कोसळली : सहा मजुरांचा करुण अंत


तोरणमाळ-खडकी रस्त्यावरील घटना : वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

धडगाव : मजूर घेवून निघालेली जीप दरीत कोसळून झालेल्या अपघातात सहा मजूर ठार झाल्याची घटना तोरणमाळ-खडकी रस्त्यावर शनिवारी सकाळी घडली. या अपघातात जीपचा सांगडाच उरला असून मयतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आरोग्य कर्मचार्‍यांसह स्थानिक गावकर्‍यांनी धाव घेतली.

जखमींवर तोरणमाळमध्ये उपचार
या अपघातात सुमारे 15 ते 20 जण जखमी झाल्याचे सांगितले जात असून जखमींवर तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तोरणमाळ ते खडकी हा घाट रस्ता तयार करण्यात आला असलातरी रस्त्याचे अद्यापही ठिकठिकाणी काम बाकी आहे. शनिवारी सकाळी खडकीहून तोरणमाळकडे मजुर घेऊन येणारे पीकअप वाहनाच्या चालकाचे नियंत्रण तीव्र चढाव आणि वळणावर सुटल्याने ते सुमारे पाच फूट खोल दरीत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू ओढवला.






सहा जणांचा जागीच मृत्यू
या अपघातात चीमा धीसा नाईक (35), बाईजिबाई रेलसिंग नाईक(38), कुचलीबाई रेलसिंग नाईक (18), रीमाबाई रायसिंग नाईक(9), सेकडीबाई सायसिंग नाईक (45), रिंगाटीबाई चिमल्या नाईक (25) यांचा मृत्यू झाला.

11 जखमींवर तोरणमाळ येथे उपचार
तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात रायसिंग चौधरी(19), मेलसिंग रायसिंग नाईक(19), सुनील रायसिंग नाईक (17), रुमाल्या बागल्या नाईक(65), शर्मिला चिमा नाईक (3 वर्षे), रायमल खेड्या नाईक (50), चोमा धिसा नाईक (45), कालसिंग वांग्या नाईक(70), आमश्या गोरख्या नाईक(30), कैलास रायसिंग नाईक(25), विजय रायसिंग नाईक (15) या जखमींवर उपचार सुरू आहेत.

जिल्हा रुग्णालयात यांच्यावर उपचार
जिल्हा रुग्णालयात सुनीता सायसिंग नाईक (15), गणेश रेवज्या रावताळे (28) , रायमल वेल्या नाईक (50), गोरख्या नाईक (5 वर्षे), बायसिंग नाईक (5 वर्षे), वांग्या नाईक (40), गोहर्‍या बाया नाईक (55) यांच्यावर उपचार सुरू आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !