भुसावळ मुख्याधिकार्‍यांबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे गार्‍हाणे


भुसावळ- पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे या कुठल्याही फायलींवर स्वाक्षर्‍या करीत नाहीत, प्रभागातील विकासकामांसंदर्भात दोन टक्के रक्कम भरून वर्क ऑर्डर काढत नाहीत या संदर्भात भुसावळातील भाजपाच्या नगरसेवकांनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांची भेट घेवून गार्‍हाणे मांडले. यावेळी नगरसेवक युवराज लोणारी, अ‍ॅड.बोधराज चौधरी, पिंटू ठाकूर, अमोल इंगळे, राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे, निक्की बत्रा, पुरूषोत्तम नारखेडे आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकार्‍यांनी नगरसेवकांचे गार्‍हाणे ऐकल्यानंतर मुख्याधिकार्‍यांना दूरध्वनी करून प्रलंबित फायलींचा निपटारा करण्यासंदर्भात तोंडी सूचना केल्याचे नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने सांगितले.

मुख्याधिकार्‍यांविषयी तक्रारी वाढल्या
मुख्याधिकारी डहाळे यांच्याविषयी यापूर्वीदेखील स्थानिक भाजपा नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे नांदेड भेटीदरम्यान तक्रारी मांडल्या होत्या शिवाय डहाळे यांची बदली रद्द करून पूर्ववत रोहिदास दोरकुळकर यांची पुन्हा बदली करण्याची मागणी केली होती.


कॉपी करू नका.