वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या वीज अभियंत्यास मारहाण
नवापूर : वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सचिन माळी आपल्या पथकासह शहरातील मंगलदास पार्कमध्ये थकीत बिलाची वसुली न झाल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेले असता त्यांना मारहाण करण्यात आली. वसुली पथक नवापूर शहरातील मंगलदास पार्क मधील वीज ग्राहक महेंद्र यशवंतराव पाटील यांच्याकडे 31 हजार 950 रुपयांची थकित विज बिल रक्कम वसुलीसाठी गेले असता बिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्यात येईल, असे सांगितल्याचा राग येऊन भेटेसिंग महेंद्र पाटील याने शिवीगाळ केली तसेच गच्ची धरुन हाताबुक्यांनी तोंडावर, उजवे डोळयाजवळ ,छातीवर मारहाण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
