सोन्याची लालसा व रोकड लुटण्याच्या इराद्यानेच कुसुंब्यातील दाम्पत्याची हत्या


जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची पत्रकार परीषदेत माहिती

जळगाव : दाम्पत्याकडे असलेल्या सोन्यासह रोकडची हाव व व्याजाने घेतलेले पैसे देण्याचा तगादा न राहणार असल्यानेच तिघांनी कुसुंब्यातील दाम्पत्याची कट रचून दोरीने गळा आवळून हत्या केल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सोमवारी दुपारी पत्रकार परीषदेत दिली. कुसुंबा येथे 21 एप्रिल रोजी राहत्या घरात मुरलीधर राजाराम पाटील (54) व त्यांच्या पत्नी आशाबाई पाटील (47) यांची दोरीने गळा आवळून खुन करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. अतिशय गुंतागुतींच्या गुन्ह्याची उकल जळगाव गुन्हे शाखेने केली असून तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती डॉ.मुंढे यांनी पत्रकार परीषदेत दिली.

आधी पतीची न नंतर पत्नीची केली हत्या
डॉ.मुंढे यांनी हत्याकांडाबाबत माहिती देताना सांगितले की, तालुक्यातील कुसूंबा भागातील ओम साईनगरात वर्षभरापुर्वीच घरबांधून दाम्पत्य आले होते. मयत अरुणाबाई या गेल्या अनेक वर्षांपासून व्याजाचा धंदा करीत असल्याने शिवाय तीने नुकतेच दुमजली टोलेजंग घर बांधले असून तिच्या घरात बर्‍यापैकी रोकड आणि सोन्याचे दागिने मिळतील याची खात्री असल्यानेच आरोपी देविदास आणि अरुणाबाईने कट रचला. सोबतीला देविदासचा मित्र सुधाकर पाटील याची मदत घेण्यात आली. अरुणाबाईचे घेणे असलेली रक्कमही द्यावी लागणार नाही आणि तिच्या घरातील घबाडातून हिस्साही मिळेल, अशी लालसा अरुणाबाईला हेती तर सुधाकर कर्जबाजारी झाला होता तसेच देविदास याला आर्थिक अडचण असल्याने तिघांनी तिचा काटा काढायचा निर्णय घेत बुधवार, 21 एप्रिल रोजीच्या रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अगोदर मुरलीधर पाटील याचा गच्चीवर गळा आवळला. त्यानंतर आशाबाईला खाली घरात त्याच दोरीने गळफास देत ठार मारण्यात आल्याची कबुली संशयीतांनी दिली.






या आरोपींना अटक
खून प्रकरणी देविदास नादेव श्रीनाथ (40, रा.गुरुदत्त कॉलनी कुसूंबा), अरुणाबाई गजानन वारंगे (30, कुसूंबा) आणि सुधाकर रामलाल पाटील (45, रा.चिंचखेडा, ता.जामनेर) यांना अटक करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह संजय हिवरकर, विजयसिंग पाटील, राजेश मेंढे, सुनील दामोदरे, विजय पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर, रवि नरवाडे, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, संतोष मायकल यांच्यासह एकुण 47 कर्मचार्‍यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मेहनत घेतली.

खुनानंतर रोकडसह दागिने लुटून पोबारा
ठरल्याप्रमाणे आरोपींनी दाम्पत्याचा खून केल्यानंतर मयताच्या अंगावरील दागिने, घरातील रोकड लुटली. सुधाकर पाटील हा त्याच्या दुचाकीवर तर देविदास श्रीनाथ व अरुणाबाई वारंगणे एका दुचाकीवरून चिंचखेडे येथे पसार झाले. आरोपींनी खुनाची कबुली देताच त्यांना अटक करण्यात आली. तपास एमआयडीसी निरीक्षक प्रताप शिकारे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !