भुसावळच्या राजश्री नेवे यांना राज्यस्तरीय स्नेहबंध प्रेरणाज्योती पुरस्कार जाहीर
भुसावळ- शहरातील सामाजिक कार्यकर्त्या व सखी श्रावणी बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा राजश्री उमेश नेवे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल स्व.हरीश्चंद्र फाऊंडेशन बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेतर्फे राज्यस्तरीय स्नेहबंध प्रेरणाज्योती पुरस्कार 2019 जाहीर करण्यात आला आहे. रविवार, 6 ऑक्टोबर रोजी डॉ.निर्मलकुमार फडकुले सभागृह, सिद्धेश्वर मंदिर शेजारी, सोलापूर येथे विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. नेवे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल निवड झाल्याबद्दल राजश्री नेवे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .