महाराष्ट्रासह हरीयाणा विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान
दोन्ही ठिकाणी 24 ऑक्टोबरला होणार मतमोजणी : मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा
दिल्ली- महाराष्ट्रासह हरीयाणा विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी केली. दोन्ही ठिकाणी 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. हरीयाणा विधानसभेचा कार्यकाळ 2 नोव्हेंबर रोजी तर महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 9 रोजी संपुष्टात येत आहे. दरम्यान, शनिवारपासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.