जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांची बदली रद्द : पदभार स्वीकारला


जळगाव : मविप्र प्रकरणात अ‍ॅड.विजय भास्कर पाटील व सहकार्‍यांना झालेली अटकेनंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांची मुंबई येथे पोलीस महासंचालक कार्यालयातील निवडणूक कक्षात बदली झाली होती तर रविवारी सायंकाळी ही बदली रद्द झाली असून रोहोम यांनी सोमवारी पुन्हा पदाचा पदभार स्वीकारला. रोहोम यांना मुंबईत महासंचालक कार्यालयात संलग्न करण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी त्यांना तातडीने कार्यमुक्तही करण्यात आले. रोहोम यांच्याबाबतीत कोणतीही तक्रार किंवा कार्यकाळही पूर्ण झालेला नव्हता. वरीष्ठांच्या आदेशाचे पालन करुन रोहोम यांनी अ‍ॅड.पाटील यांना अटक केली होती. या अटकसत्रामुळे दोन दिवस मोठ्या घडामोडी घडल्या. रोहोम यांना या गुन्ह्याचे कागदपत्रे घेऊन मुंबईत पाचारण करण्यात आले तर रविवारी बदली आदेश स्थगित करण्यात आले. दरम्यान, सोमवारी पदभार स्वीकारल्याच्या वृत्ताला रोहोम यांनी दुजोरा दिला.


कॉपी करू नका.