वाळू वाहतुकीचे डंपर अडवल्याने महिला तलाठ्यास मारहाण : नगरसेवकांसह तिघांना अटक
नंदुरबार : महिला तलाठी निशा पावरा यांनी नंदुरबारात वाळू वाहतूक करणारे डंपर अडवल्यानंतर त्यांना नगरसेवक गौरव चौधरी यांच्यासह शुभम जाधव व चालक गुरव यांनी मारहाण केल्याची घटना 5 जून रोजी नंदुरबारातील वळण रस्त्यावर घडली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींना शनिवारी अटक करण्यात आली. संशयीतांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
