थोरगव्हाणच्या तरुणाची विष प्राशनाने आत्महत्या


यावल : तालुक्यातील थोरगव्हाण येथील पवन भागवत पाटील (22) या तरुणाने शेतात काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. तत्पूर्वी यावल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक औषधोपचारासाठी सायंकाळी सहा वाजता आणले असता वैद्यकीय अधिकारी एन.डी.महाजन यांनी त्यास मयत घोषित केले. त्याच्या पश्‍चात आई-वडील, भाऊ, बहिण असा परीवार आहे. यावल पोलीस स्टेशनला मयताचे काका भारत चावदस पाटील यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत पवन हा जळगाव येथे हमालीचे काम करायचा मात्र त्याने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. तरुणाच्या मृत्यूने थोरगव्हाण गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !