ब्रेक फेल झाल्यानेच सिंदीदीगर घाटात अपघात : सदोष पद्धत्तीने रस्त्याचे काम
शहादा : राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ खोर्याचा अतिदुर्गम भाग असणार्या सिंदीदिगर घाटात दोन दिवसांपूर्वी क्रुझर गाडी दरीत कोसळून आठ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. हा अपघात क्रुझरचे ब्रेक फेल झाल्यानेच झाल्याचा निष्कर्ष महामार्ग सुरक्षा पथकाने काढला असून सदोष रस्त्याची बाबही या निमित्ताने समोर आली आहे. घाटात कठडे असते शिवाय इतका उतार नसता तर अपघात टळला असता तर कदाचित प्राणहानी टळलीदेखील असती.
अपघातात या प्रवाशांचा मृत्यू
यास अपघातात गुमानसिंग तुळशिराम निगवाल (35, सेमलेट, ता.पाटी, जि.बडवाणी (म.प्र.), कागिराम गला तडवे (25, रा.चेरवी, ता.पाटी, जि.बडवाणी (म.प्र.), शुकगी हरदास निगवाल (20, रा.चेरवी, ता.पाटी, जि.बडवाणी (म.प्र.), कमलसिंग रेमसिंग ठाकुर (40, रा.खेरवाणी, पोस्ट सेमलेट, ता.पाटी, जि. बडवाणी), मुभा सीलदार तडवे (35, रा. चेरवी , ता.पाटी, जि.बडवाणी (म.प्र.), भाकीराम सेवा निगवाल (31, रा.सेमलेट, ता.पाटी, जि.बडवाणी (म.प्र.), वेरंग्या धनसिंग सोलंकी, (42, रा.सेमलेट, ता.पाटी, जि.बडवाणी (म.प्र.), आधार्या बुला मानकर (30, चेरखीचा सागबारापाडा, ता.पाटी, जि.बडवाणी) यांचा मृत्यू झाला आहे तर अन्य चार प्रवासी जखमी झाले आहेत. अपघात प्रकरणी जलसिंग खरते (रा.गोलगांव, ता.पाटी, जि.बडवाणी) यांच्या फिर्यादीवरुन चालक राकेश तुळशिराम सोलंकी (सेमलेट, ता.पाटी) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.





