नंदुरबारात दोन गटात वादानंतर तुफान दगडफेक : जमावाने जाळल्या दुचाकी
नंदुरबार : शहरातील कसाई हट्टी, चिंचपाडा भिलाटी परीसरात दोन गटात वाद उळाफल्याने जमावाने तुफान दगडफेक केल्याची घटना 9 ऑगस्ट रोजी घडली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. शहरात अफवा पसरल्याने पळापळ होऊन बाजारपेठा बंद झाल्या. दरम्यान दुसर्या दिवशी म्हणजे 10 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास रात्रीच्या वादाचे पडसाद उमटले. या भागात पुन्हा दगडफेक करण्यात आली तर जमावाने काही ठिकाणी मोटर सायकल यांची तोडफोड करून नुकसान केले. या घटनेमुळे शहरात दंगल झाल्याची अफवा पसरल्याने हाट दरवाजा, मंगळ बाजार, जळका बाजार, कापड बाजार आदी प्रमुख बाजारपेठा पटापट बंद झाल्या. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घटनास्थळी भेट देऊन परीस्थितीचा आढावा घेत वातावरण शांत केले. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 13 संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे.
