नागपूरमधील राज्य टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जळगावचा डंका


भुसावळ : नागपूर येथे नुकत्याच झालेल्या 17 व्या 16 वर्षाआतील राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत जळगावच्या संघाने मुंबईला नमवत तृतीयस्थानी यश मिळवले. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नागपूरने पुण्याच्या संघाला नमवत प्रथमस्थानी येण्याचा मान मिळवला. नागपूरातील विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या राज्य स्पर्धेत 32 संघांनी सहभाग घेतला. अहोरात्र प्रकाशझोतात झालेल्या स्पर्धेत जळगाव संघाने साखळी सामन्यात कोल्हापूर, नंदुरबार या संघाचा पराभव करीत उपउपांत्य फेरीत भंडारा संघाला नमविले मात्र उपांत्य फेरीत नागपूरशी 12 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. तिसर्‍या स्थानासाठी झालेल्या जळगाव, मुंबई सामन्यात मुंबईला अत्यंत चुरशीच्या सामन्यात अवघ्या तीन धावांनी बाजी मारत तृतीय स्थान पटकावले.स्पर्धेतील विजेतेपद नागपूरने पुण्याला चार गड्यांनी नमवत अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू उत्तर प्रदेश येथील सलेमपुर येथे होणार्‍या 24 ते 28 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करतील.

जळगावच्या संघाचा मान्यवरांनी केला गौरव
जळगावच्या संघास राज्यमंत्री आमदार सुधाकर देशमुख, नागपूर जिल्हा परीषदेचे शिक्षणाधिकारी डॉ.एस.एन.पटवे, नगरसेवक झुल्फीकार अली भुट्टो, भूषण शिंदे, राज्य संघटनेचे सचिव मोहम्मद बाबर,यक्ष बाबूलाल धोत्रे, सायमा सिद्दिकी, मुकुंद झन्कार, अमजद खान, योगेश परदेशी, जिल्हा सचिव वासेफ पटेल, मजीद शेख, प्रतीक कुलकर्णी, तारीख अहमद, राहुल कोळी, विकास वर्मा, वसीम शेख यांच्या हस्ते रोख पारितोषिक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.


कॉपी करू नका.