भुसावळातील दिव्यांग युवतीवर अत्याचार करणारा आरोपी जाळयात


बाजारपेठ पोलिसांची कामगिरी : सुरतमधून आवळल्या मुसक्या

भुसावळ : शहरातील 17 वर्षीय युवतीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करणार्‍या आरोपीच्या सुरतमधून मुसक्या आवळण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे. शेख अमीन शेख अकिल शेख (27, रा.मुस्लिम कॉलनी, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

अत्याचार केल्यानंतर काढला पळ
शहरातील एका भागातील 17 वर्षीय अल्पवयीन युवतीवर यातील आरोपीने अमीन शेखने चाकूचा धाक दाखवत अत्याचार केला व नंतर कारवाईच्या भीतीने आरोपी सुरत गाठले. आरोपी सुरतमध्ये असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याच्या बुधवारी रात्री मिठीखाडी भागातून सुरत क्राईम ब्रँचच्या सहकार्याने मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजाजन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली रमण सुरळकर, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आदींनी केली.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !