माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर ?


भाजपाच्या विद्यमान आमदारांची कोंडी : तर राज्यात बदलणार समीकरणे

मुक्ताईनगर : सुमारे तीन वर्षांपासून मंत्री पासून अलिप्त असलेल्या एकनाथराव खडसेंची ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपाने तिकीट न देवून कोंडी केल्यानंतर खडसेंसह त्यांचे समर्थक प्रचंड संतप्त झाले आहेत. खडसेंऐवजी त्यांची कन्या अ‍ॅड.रोहिणी यांनी तिकीट मागितले नसतानाही त्यांना तिकीट देवू करण्यात आले मात्र या खडसे समर्थकांना नाथाभाऊ विधानसभेत हवे असल्याने भाऊंनी आता पक्ष सोडून जशास तसे उत्तर द्यावे, या मानसिकतेत कार्यकर्ते आले आहेत. 42 वर्षांपासून पक्षासाठी खस्ता खाणारे खडसे आता पक्ष सोडणार का ? असा प्रश्‍न उपस्थित होत असून खडसे मात्र आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. यास अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नसलातरी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार त्यांच्या भेटीसाठी गुरुवारी मुक्ताईनगरातील फार्महाऊसवर बीडचा दौरा आटोपून निघाले असून दुपारपर्यंत मोठा निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपाच्या आमदारांना धाकधूक
खडसेंनी पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास राज्यात समीकरणे बदलू शकतात, असे जाणकारांना वाटते शिवाय राज्यभर विखुरलेला एकसंघ लेवा समाज खडसेंच्या पाठीशी शिवाय ओबीसी समाजाचा चेहरा असलेल्या खडसेंना मानणारा मोठा वर्ग असल्याने खडसेंनी भाजपा सोडल्यास भाजपाच्या विद्यमान आमदारांसह राज्यातील इच्छूक उमेदवारांची डोकेदुखी वाढू शकते, असेदेखील राजकीय विश्‍लेषकांना वाटते.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !