माजी मंत्री खडसेंसह विनोद तावडेंना तिर्‍या यादीतही स्थान नाही


मुंबई : भाजपाने जारी केलेल्या तिसर्‍या यादीतही भाजपाचे हेवीवेट नेते एकनाथराव खडसे यांना संधी मिळालेली नाही तर त्यांच्याप्रमाणे विनोद तावडेही आता वेटींगवर आहेत. भारतीय जनता पक्षाच्या जाहीर झालेल्या याद्यांमध्ये एकनाथराव खडसे यांचे नाव नसल्याने त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून यातदेखील खडसे यांचे नाव नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे त्यांचे समर्थक आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

मुक्ताईनगरात वातावरण तापले
खडसेंच्या उमेदवारीबाबत पक्ष निर्णय घेत नसल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. सायंकाळी खडसेंच्या भूमिकेनंतर महामार्गावर रस्ता रोको करण्याचाही प्रयत्न झाला. कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्‍वभूमीवर सायंकाळी पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी भेट देत परीस्थिती जाणून घेतली.

या उमेदवारांना तिसर्‍या यादीत संधी
भाजपाचे जे.पी.नड्डा यांच्या स्वाक्षरीने गुरूवारी सायंकाळी जाहीर झालेल्या यादीत शिरपूरमधून काशीराम पावरा, रामटेकमधून डॉ.मलिक्कार्जुन रेड्डी, साकोलीतून परीणय फुके तर मालाड वेस्टमधून रमेशसिंग ठाकूर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !