जळगाव घरकुल घोटाळा : देवकर, आमदार सोनवणेंसह इतरांना जामीन मंजूर

जळगाव : जळगाव महापालिकेतील घरकुल घोटाळ्याप्रकरणी शिक्षा लागलेल्या माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह आमदार चंद्रकांत सोनवणे व अन्य नगरसेवकांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपींनी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात केलेल्या अर्जानुसार आज त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
27 आरोपींचे जामिनासाठी अर्ज
माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच आ.चंद्रकांत सोनवणे यांच्यासह शिक्षा झालेल्या सुमारे 27 जणांनी जामिनासाठी अर्ज केले होते. यातील दवाखान्यात दाखल असलेल्यांच्या जामीन अर्जावर तूर्त निर्णय देण्यात आलेला नाही. तसेच सुरेश जैन, राजेंद्र मयूर, जगन्नाथ वाणी, प्रदिप रायसोनी यांना मात्र जामीन मंजूर झालेला नाही. दरम्यान, यापूर्वी जामीन अर्जावर दोनवेळा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. शुक्रवारी अखेर त्यावर निर्णय झाला असून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.