भुसावळच्या आखाड्यात डॉ.मधू मानवतकर यांनीही थोपटले दंड


अपक्ष राहून निकराची झुंज देणार : रुग्ण सेवेच्या माध्यमातून मानवतकर दाम्पत्याची वेगळी ओळख

भुसावळ :  रुग्ण सेवेला प्राधान्य मानून कार्य करणार्‍या भुसावळातील डॉ.मानवतकर दाम्पत्य हे शहर व तालुकावासीयांना परीचीत आहे. डॉ.मधू राजेश मानवतकर यांनी भाजपाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले मात्र त्यात यश न आल्याने त्यांनी अपक्ष दावेदारी करीत फार्म भरला असून त्या आता पूर्णपणे निवडणूक आखाड्यात उतरल्या आहेत. भुसावळ विधानसभेची निवडणूक लढवायचीच, असा प्रण त्यांनी केला असून त्यासाठी मतदारांचा जनसंपर्क व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत.

रुग्ण सेवेचा वसा
डॉ.राजेश मानवतकर हे भुसावळातील प्रथितयश डॉक्टर असल्याने संपूर्ण शहर व तालुकावासीयांना ते परीचीत आहेत. प्रज्ञासूर्य फाऊंडेेशनच्या माध्यमातून त्यांनी विविधांगी सामाजिक उपक्रमही राबवले आहेत. समाजसेवेठी त्यांनी पत्नी डॉ.मधू मानवतकर यांना भाजपाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले मात्र काही कारणास्तव त्यांनी उमेदवारी मिळाली नसलीतरी त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे.









बड्या नेत्याची साथ मिळणार!
डॉ.मधू मानवतकर यांना भुसावळातील एका बड्या नेत्याचे पाठबळ मिळणार असल्याची दाट शक्यता आहे. या माध्यमातून दोन दिवसात त्या जनतेपुढे येतील, अशीदेखील चर्चा आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !