भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेसच्या मार्गात

भुसावळ : मध्य रेल्वेच्या पुणे मंडळात तांत्रिक कामासाठी भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला असून अप-डाऊन गाडी मनमाड-दौंडमार्गे चालवण्यात येणार आहे. अप 11025 भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस 5 ते 14 ऑक्टोबदरम्यान मनमाड, दौंडमार्गे पुण्यापर्यंत धावणार आहे तर परतीच्या प्रवासात डाऊन 11026 डाउन पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस 5 ते 14 ऑक्टोबदरम्यान दौंड, मनमाडमार्गे भुसावळपर्यंत धावणार आहे.

