मालेगाव तालुक्यात वीज पडून दोन ठार ; तीन जखमी


मालेगाव : तालुक्यातील टोकडे येथे वीज पडून दोन जण ठार, तर तिघे जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. टोकडे शिवारातील शेतात दीपक विठोबा डिंगर, समाधान गायकवाड, प्रतिभा सोनवणे, प्रवीण नवरे, खुशाल सोनवणे आदी शेतमजूर काम करीत होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरवात झाली. यावेळी वीज कोसळून दीपक विठोबा डिंगर (३०) व समाधान दयाराम गायकवाड (२४) हे जागीच ठार झाले. प्रतिभा रतिलाल सोनवणे (१९), प्रवीण देवाजी नवरे (१४) व खुशाल रतिलाल सोनवणे (१५) हे या घटनेत गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींना उपचारार्थ सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !