माजी मंत्री सुरेश जैनांसह जणांच्या जामिनावर 15 ऑक्टोबरला सुनावणी

औरंगाबाद : माजी मंत्री सुरेश जैनांसह जगन्नाथ वाणी, राजेंद्र मयूर, प्रदीप रायसोनी तसेच पी.डी.काळे आदींच्या जामीन अर्जांवर 15 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शुक्रवारी माजी मंत्री गुलाबराव देवकरांसह 35 जणांचे जामीन अर्ज अटी-शर्तीवर मंजूर केला आहे तर लता भोईटे या रुग्णालयात असल्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावर 18 ऑक्टोबर रोजी सुनावणी होईल, असे सूत्रांनी सांगितले.
35 संशयीतांना अटी-शर्तीवर मिळाला जामीन
खंडपीठाने माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार चंद्रकांत सोनवणे, विजय रामदास वाणी, अजय राम जाधव, चत्रभूज सोमा सोनवणे, कैलास नारायण सोनवणे, सदाशिव गणपत ढेकळे, देविदास धांडे, दत्तू देवराम कोळी, डिगंबर दलपत पाटील, सुनंदा रमेश चांदेलकर, मिना अमृत मंधान, अशोक रामदास परदेशी, शिवचरण कन्हैय्या ढंढोरे, रेखा चत्रभूज सोनवणे, चुडामण शंकर पाटील, वासुदेव परशराम सोनवणे, इकबाल पीरजादे, मंजुळा धर्मेंद्र कदम, विमल बुधा पाटील, सुभद्राबाई सुरेश नाईक ,पुष्पलता शालिग्राम अत्तरदे, शांताराम चिंधू सपकाळे, लिलाधर नथ्थू सरोदे, अफजलखान रऊफखान पटवे, मुमताजबी हुसैन खान, निर्मला सुर्यकांत भोसले, सरस्वतीबाई रामदास कोळी, अरुण नारायण शिरसाळे, अलका अरविंद राणे, चंद्रकांत शंकर कापसे, डिगंबर दौलत वाणी, भगत रावलमल बालाणी, पांडूरंग रघुनाथ काळे, लक्ष्मीकांत तुकाराम चौधरी यांना अटी-शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला.