भुसावळातील निखील राजपूतसह तिघे हद्दपार एलसीबीच्या जाळ्यात


हद्दपारी आदेशाचे उल्लंघण केल्याने गुन्हा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गस्त वाढवली

भुसावळ : सामाजिक शांततेला अडसर ठरणार्‍या आरोपींना प्रांताधिकार्‍यांनी हद्दपार केल्यानंतरही काही संशयीत राजरोसपणे शहरात फिरत असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्याने भुसावळातील दोघांसह जळगावच्या एकाला अटक करण्यात आली. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भुसाळातील निखील सुरेश राजपूत (रा़ भुसावळ) व शामल शशिकांत सपकाळे (रा़ भुसावळ) सह परशुराम पाटील (जळगाव) अशी अटकेतील आरोपींचा समावेश आहे.

तीन आरोपींना अटक
भुसावळ शहरातील श्रीरामनगर भागातून निखील सुरेश राजपूत या हद्दपार आरोपीच्या शुक्रवारी सायंकाळी मुसक्या आवळण्यात आल्या तर भुसावळ शहरातील जुना सातारा भागातून हद्दपार आरोपी शामल शशिकांत सपकाळे (25, रा.जुना सातारा, मरीमातामंदिराजवळ, भुसावळ) यासही अटक करण्यात आली. ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अशोक महाजन, रवींद्र पाटील, अनिल जाधव, शरीफ काझी, युनूस शेख, सुधाकर अंभोरे, दीपक शांताराम पाटील, दादाभाऊ पाटील, दर्शन ढाकणे यांनी ही कारवाई केली. दरम्यान, तिसर्‍या कारवाईत जळगाव शहरातील गेंदालाल मिल परीसरातून परशुराम विलास पाटील (27, लक्ष्मीनगर, गल्ली नंबर दोन, जळगाव) यास अटक करण्यात आली.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !