भुसावळात उद्या विभागीय सायकलिंग अकॅडमीसाठी 6 रोजी जिल्हा निवड चाचणी

भुसावळ : भारत सरकार व सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सायकलिंग अकॅडमी योजना राबवली जात आहे. ही योजना खेलो इंडिया अंतर्गत असून नवी दिल्ली व गुवाहाटी येथे अकॅडमी सुरू असून या चाचणीसाठी 1 जानेवारी 2003 ते 31 डिसेंबर 2006 दरम्यान जन्म झालेली मुले, मुली पात्र ठरणार आहे. या योजनेंतर्गत खेळाडूंना ऑलंम्पिक पात्रतेसाठी आवश्यक सराव प्रशिक्षण देण्यासाठी कालबद्ध नियोजन करण्यात आले आहे. खेळाडूंचे प्रशिक्षण निवास भोजन शिक्षण इत्यादी खर्च खेळाडूंना दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. जळगाव जिल्हा निवड चाचणी भुसावळातील द.शि.विद्यालयाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर रविवार, 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता होत आहे.
पात्र खेळाडूंची पुण्यासाठी स्पर्धेसाठी होणार निवड
मुलांकरीता 1600 मीटर तर मुलींकरता 800 मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी यामध्ये निवड झालेल्या पात्र खेळाडूंना पुणे येथे 13 ऑक्टोबर रोजी होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन सायकलिंग असोसिएशनचे प्रदीप साखरे (7020358118), सचिव बी.एन.पाटील. (9422784979), नरेंद्र म्हस्के (मो.9823648270) यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी यांच्याकडे संपर्क साधावा असे संघटनेने कळवले आहे.