चाळीसगावात तिघांचे नामनिर्देशन ठरले अवैध

चाळीसगाव : चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून 16 उमेदवारांनी एकूण 27 नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. शनिवारी अर्ज छाननीत 16 पैकी तीन उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरली.
13 उमेदवारांचे अर्ज वैध : माघारीनंतर स्पष्ट होणार चित्र
चाळीसगाव विधानसभेसाठी आता रींगणात 13 उमेदवार असलेतरी माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. वैध अर्ज असणार्या 13 उमेदवारांमध्ये ओंकार पितांबर केदार (बसपा), राजीव अनिल देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस), मंगेश रमेश चव्हाण (भाजपा), राकेश लालचंद जाधव (मनसे), मोरसिंग गोपा राठोड (वंचित बहुजन आघाडी), ईश्वर दयाराम मोरे (अपक्ष), उमेश प्रकाश कर्पे (अपक्ष), तुषार आप्पासाहेब राठोड (अपक्ष), प्रतिभा मंगेश चव्हाण-पाटील (अपक्ष), डॉ.विनोद मुरलीधर कोतकर (अपक्ष), सुभाष हिरालाल चव्हाण (अपक्ष), संजय भास्कर पाटील (अपक्ष).