शिक्षकाची न्हावीत नैराश्यातून आत्महत्या


यावल : तालुक्यातील न्हावी येथील रहिवासी व बोहर्डी शाळेतील शिक्षक गणेश चुडामण कोलते (51) यांनी नैराशातून विषारी द्रव सेवन करून ात्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी तीन वाजता घडली. आमोदा-फैजपूर रस्त्यावर त्यांनी आपली दुचाकी उभी करीत मोर नदीजवळ काहीतरी विषारी द्रव सेवन केले. काहींनी ही घटना पाहताच कोलते यांना फैजपूर येथील खाजगी दवाखान्यात हलवले मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत फैजपूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. कोलते यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !