भुसावळातील युवतीचे अपहरण करणार्या युवकांचा पोलिसांकडून कसून शोध

भुसावळ- साकेगाव येथून आजी सोबत येथील जामनेर रोडवरील भारतीय स्टेट बॅकेच्या शाखेत पेन्शन काढण्यात आलेल्या 22 वर्षीय युवतीला कारमध्ये बसवून अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुरूवारपासून पसार असलेल्या दोन्ही युवकांचा शोध बाजारपेठ पोलिसांकडून घेतला जात आहे. आजी सोबत पेन्शन काढण्यासाठी आलेली 22 वर्षीय युवती बँकेच्या बाहेर येताच संशयीत आरोपी अभिषेक शर्मा, (रा. चमेली नगर, भुसावळ) व त्याचा मित्र मयूर महाजन (रा. श्रीराम नगर, भुसावळ) यांनी तरुणीला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मिलिंद कंक पुढील तपास करीत आहेत.