जि.प.पोटनिवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या कन्या धरती पाटील विजयी
धुळे : भाजपाचे गुजरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उर्फ सी.आर पाटील यांच्या कन्या धरती देवरे यांचा जिल्हा परीषद पोटनिवडणुकीत विजय झाला आहे. भाजपाकडून धरती पाटील यांना जि.प.पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली होती. देवरे यांनी या निवडणुकीत धरती देवरे यांनी बाजी मारली आहे. मागील निवडणुकीत धरती देवरे बिनविरोध विजयी झाल्या होत्या. धुळ्यात भाजपाला बहुमतासाठी 14 जागांपैकी 2 जागांची गरज आहे. याठिकाणी जिल्हा परीषद 15 आणि पंचायत समितीच्या 30 जागांसाठी मतदान झाले. यातील एका गटात शिवसेनेचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. सध्या धुळे जिल्हा परीषदेत सत्ता भाजपाकडे आहे.
