यावलमधील हरीता-सरीताच्या संगमावर भाजपातर्फे जलपूजन
यावल- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे यावल शहरालगत असलेल्या हरीता आणि सरिता नदीला गुरुवारी मोठ्या प्रमाणावर पाणी आलनंतर यावल शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने दोन्ही नद्यांच्या संगमावर जलपूजन करण्यात आले. विधीवत पूजन करून नदीची साडी चोळीने ओटी भरण्यात आली. यावल शहरासह संपूर्ण परीसरातील जनतेला आशीर्वाद कायम राहू दे ? अशी विनवणी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमप्रसंगी भारतीय जनता पार्टी यावल शहराध्यक्ष हेमराज फेगडे, माधुरी हेमराज फेगडे, डॉ.निलेश गडे, सविता निलेश गडे, स्नेहल फिरके, पूजा फिरके, अश्वजीत सिंह पाटील, कविता पाटील, राजीव फालक, नगरसेविका पौर्णिमा फालक, दिवाकर तळेले, सुनीता तळेले, योगेश चौधरी, गुणवंती चौधरी, योगेश वाणी, सोनाली वाणी, वसंतराव भोसले, गोपाळसिंह पाटील, किशोर कुलकर्णी, उमेश फेगडे, राम नागराज, बबलू घारू, रीतेश बारी, जनार्दन फेगडे, गजू कुंभार, मंदार गडे, पंकज येवले, सुनील येवले, गोटू वायकोळे, अतुल भोसले, सुनील मोरे, मनोज पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पौरोहित्य सुनील जोशी महाराज यांने केले.