नंदुरबार शहरात 11 लाखांचा विमल गुटखा जप्त


आयजींच्या पथकासह गुन्हे शाखेची कारवाई : दोघा आरोपींना केली अटक

नंदुरबार : नाशिक परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या पथकासह नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करीत 11 लाख 28 हजार 80 रुपयांचा गुटखा व तंबाखू जप्त केल्याने गुटखा विक्री करणार्‍यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चारचाकी बोलेरो जप्त करण्यात आली. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांच्या विशेष पथकाला गुटख्यासह तंबाखूबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर बुधवार, 20 रोजी पथकाने नंदुरबार शहरातील खंडेराव महाराज मंदिरासमोरील शाहुनगरात छापा टाकला. महिंद्रा बोलेरो पिकअप (क्रमांक एम.एच.39 डी.0155) ची झडती घेतल्यानंतर त्यात विमल गुटख्याचे 25 पोते तसेच विमल तंबाखूचे 25 पोते जप्त केले. चार लाखांच्या बोलेरोसह 15 लाख 28 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी बोलेरा चालक विक्की चांदरेशकुमार शर्मा (27, रा.जुनी सिंधी कॉलनी, नंदुरबार) व मालक राकेश सुरेश जाधव (36, रा.संभाजी नगर, नंदुरबार) यांना अटक करण्यात आली. दोघा आरोपींविरोधात नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला करण्यात आला. ही कारवाई आयजींच्या विशेष पथकातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक बी.जी.रोहोम, रामचंद्र बोरसे, बशीर तडवी, मनोज दुसाणे आदींच्या पथकाने केली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !