अपक्ष उमेदवार अनिलभाऊ चौधरींचा एकच ध्यास : मतदारसंघाचा विकास

पाल गावात अनिल चौधरी यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
रावेर : रावेर विधानसभेच्या रींगणात उतरलेल्या अपक्ष उमेदवार अनिलभाऊ चौधरी यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मतदारसंघाचा विकास हाच आपला ध्यास असल्याचे ते म्हणाले. बुधवारी शेकडो कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी रावेर तालुक्यात प्रचार दौर्याला सुरुवात केली. पाल गावात प्रचार दौर्यानिमित्त गेल्यानंतर आदिवासी बांधवांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दौर्यादरम्यान माय-बाप जनतेचे आशीर्वाद मिळाले असल्याची प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांनी व्यक्त दिली. भुसावळ कृउबा सभापती सचिन चौधरी, भुरेखा तडवी, दिलीप बंजारा, राजू तडवी, मनोहर चौहान, नसीम पठाण व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, रावेर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांना अनुक्रमांक सहा मिळाला असून चिन्ह म्हणून दूरदर्शन (टीव्ही) मिळाला आहे.
