नांद्रा येथील इसमाचा खदानीत बुडाल्याने मृत्यू


पाचोरा : आसनखेडा रोडवरील खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या नांद्रा येथील ईश्वर सुभाष पाटील (42, नांद्रा, ता.पाचोरा) यांचा बुधवारी दुपारी खदानीत बुडाल्यो मृत्यू झाला. यावेळी त्यांच्या आई रजूबाई या खदानीच्या किनार्‍यावर धुणे धूत होत्या. मुलाला बुडताना पाहताच त्यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारील गुराख्यांनी व गावातील तरुणांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मयत ईश्वरच्या पश्चात आई व दोन मुले असा परीवार आहे. घटा पोलीस पाटील किरण तावडे व पाचोरा पोसि स्टेशनचे नांद्रा बिटचे सहाय्यक फौजदार हिरामण चौधरी व रामभाऊ चौधरी यांनी भेट दिली. दरम्यान, मोलमजूरी करून आई व दोन मुलांचा सांभाळ करणार्‍या ईश्‍वर यांच्या मृत्यू हळहळ व्यक्त करण्यात आली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !